*पो. स्टे.सावली हद्दीत अवैध्य रित्या देशी विदेशी दारू 54 पेट्या बाळगुण विक्री व वाहतूक करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 15,94,970 रु चा माल जप्त*
** आज दिनांक 07/02/26 रोजी मुखबीरचे खबरीवरुन पो. स्टे. सावली हद्दीत व्याहाड बुद्रक येथील इसम नामे महेश गड्डमवर रा.व्याहाड बुद्रुक हा त्याचे परिणीती ट्रान्सपोर्ट एक्वा चिल्ड वॉटर नावाचे ऑफिस व गोडाऊन येथून एका लाल रंगाचे क्रेटा कार मधे देशी व विदेशी दारू वाहतूक करणार आहे अश्या माहितीवरून सदर कार व ऑफिस व गोडाऊन ची पंचासमक्ष झडती घेतली असता
1) देशी दारू 3800 नग प्रत्येकी 90 ml च्या देशी दारूच्या शिष्या की.1,52,000/-
2) 384 नग रॉयल स्टॅग विदेशी कंपनी च्या 180 मिली च्या शिष्या (मध्य प्रदेश) की. 99,840/- रू
3) 96 रॉयल स्टॅग विदेशी कंपनी च्या 180 मिली च्या शिष्या (महाराष्ट्र ) की. 24,000/- रू
4) 144 हवाड्स 5000 कंपनी च्या 500 मिली च्या कैन की.18,720/- रु
5) 2,95,410/- रुपये नगदी दुकानाचे ड्रॉवर मधे असलेले
6) कैमरा चा डीव्हीआर की 5,000/-
7) लाल रंगाची हुंडाई क्रेटा कार क्र MH 40 AR 2365 कि. 10,00,000/- रु असा एकूण 15,94,970/-
चा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद पाहिजे आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
*पो. स्टे सावली अप.क्र. /26 कलम* ६५ (ई )म.दा.का सहकलम ३३६(२) बी एन एस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली




