Friday, April 17, 2026
Google search engine
spot_img

पत्रकारांच्या हक्क आणि अस्तित्वाचा मुद्दा राज्यस्तरीय अधिवेशनात रंगणार चर्चेचा महासंग्राम; लघु व मध्यम वृत्तपत्रांचा आवाज उठविणारे अधिवेशन वरोरा येथे २१ फेब्रुवारीला

चंद्रपूर । प्रतिनिधी

लघु व मध्यम वृत्तपत्रांसमोरील प्रश्न, आव्हाने आणि आधुनिक माध्यमातील संधी यावर सखोल चर्चा करण्यासाठी स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारांचे एकदिवसीय खुले अधिवेशन शनिवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी ११.०० वाजता नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथे सुरू होऊन दुपारी ३.०० वाजेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पत्रकार, संपादक, प्रकाशक, मुद्रक, वार्ताहर तसेच डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिवेशनाचे उद्घाटन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर, तर प्रमुख अतिथी

म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी देरकर आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर राजेशजी येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा मंगेशजी वरकड, तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वरजी कल्याणकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तमजी वाडकर राहतील. तसेच शिवसेना (शिंदे गट) लोकसभा संघटक मुकेशजी जीवतोडे, अर्चना ठाकरे नगराध्यक्ष नगरपरिषद वरोरा यांचीही उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात लघु व मध्यम वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, जाहिरात धोरणातील बदल, शासकीय मान्यतेच्या प्रक्रिया, डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत झालेले परिवर्तन, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि संधी

या विषयांवर सखोल मार्गदर्शन व मुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. सहभागी पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधींना या अधिवेशनात आपले अनुभव, मते आणि सूचना मांडण्याची संधी दिली जाणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरशिंग, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष धरमकर, राज्य सचिव आशिष घुमे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जीवन बागडे, आणि अभीषेक भागडे यांनी संयुक्तपणे केले आहे.

विविध पुरस्कारांची घोषणा

अधिवेशनात विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, राज्यभरातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू यामागे आहे. राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या प्रदेशाध्यक्ष अश्विनी पुरी यांना

प्रदान केला जाईल. जीवनगौरव पुरस्कार डॉ. विश्वास आरोटे, संपादक दैनिक समर्थ गावकरी, राज्य सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ), अकोले, पंढरीनाथ बोकारे, जेष्ठ पत्रकार, नांदेड, राजू पाटील, संपादक दैनिक मनोगत आणि द रिंगण लाईव्ह, औसा (लातूर), किशोर पाटील, संपादक दैनिक स्वराज्य तोरण, भिवंडी, रमाकांत साळुंके, संपादक साप्ताहिक सिद्धेश्वर संदेश, सोलापूर, ज्ञानेश्वर धुळे, संपादक साप्ताहिक कारंजा सामना, कारंजा, डॉ. मेहबूब मालाबोडी, संपादक डिपार्टमेंट एक्सप्रेस, कर्नाटक, नारू, ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार, हैद्राबाद (तेलंगणा) , विलासकुमार गणपती सिंधे, संपादक दैनिक हेज्जे गुरुटू, कर्नाटक, डॉ. सुरेश चिंचोळकर, संपादक साप्ताहिक बिरसा वार्ता, यवतमाळ, आनंद शुक्ला, संपादक साप्ताहिक जागरण, वर्धा, श्याम ठेंगडी, जेष्ठ पत्रकार, दैनिक तरुण भारत, वरोरायाशिवाय देवदूत पुरस्कार वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे यांना जाहीर करण्यात आला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments