*चंद्रपूर : पत्रकार हा समाजाचा दीपस्तंभ – सुधीर मुनगंटीवार*
*चंद्रपूर :* पत्रकार हा केवळ लोकशाहीचा चौथा स्तंभ नव्हे तर समाजाचा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित होते.
यावेळी अपराजित म्हणाले, ग्रामीण पत्रकारिता ही पत्रकारितेचा कणा असून तंत्रज्ञान बदलले तरी सत्यता व निष्पक्षता जपली पाहिजे. तर मुनगंटीवार म्हणाले, वेगापेक्षा बातमीची विश्वसनीयता महत्त्वाची आहे.
यावेळी राज्य सचिव राजेश डांगटे, जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, कुकु सहानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
*सत्कार सोहळा:* मेळाव्यात कोरपना, बल्लारशाह, सावली, वरोरा, चिमूरसह 10 तालुकाध्यक्षांचा तसेच शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश सोलापन, सूत्रसंचालन विनोद पन्नासे व आभार अनिल देठे यांनी मानले.




