Wednesday, August 19, 2026
Google search engine
spot_img

मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांच्या सेवेचा संकल्प- ना.सुधीर मुनगंटीवारमारोडा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबीर

चंद्रपूर, दि.05: जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. लोकांच्या आरोग्यासाठी सहकार्याचा हात पुढे करत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलीचे वाटप, बालकांच्या हृदयाची शस्त्रक्रिया,50 हजारपेक्षा जास्त लोकांचे नेत्र चिकित्सा शिबिर, 35 हजारपेक्षा जास्त लोकांना चष्मेवाटप तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मारोडा येथे माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या माध्यमातून व मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून भव्य नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, सरपंच (मारोडा) भिकाजी शेंडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, चंदु मारगोनवार, प्रेमदास गेडाम, जयश्री वेलकेवार, नंदु रणदिवे, प्रियंका नरमलवार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मतदारसंघाचा विकास साधतांना येथील नागरीकांना अपेक्षित असलेली विकासकामे मार्गी लावली आहेत. असे सांगून पालकमंत्री  ना. मुनगंटीवार म्हणाले,  मुल ते मारोडा रस्ता, कृषी महाविद्यालय, सिमेंट काँक्रिट रोड, मारोडा रेल्वे थांबा आदि विविध कामे पुर्णत्वास आली असून या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.  मारोडा गाव विकसीत व्हावे यासाठी येथे कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावाच्या विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मारोडा येथील तलावाचे सौंदर्यीकरण, वाचनालय, महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मारोडा प्रवेशद्वार उभारण्याची येथील गावकऱ्यांची मागणी होती, हि मागणी लक्षात घेवून प्रवेशद्वार (गेट) उभारणीसाठी वनविभागाच्या ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून 25 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

spot_img
Previous article
Next article
पीक विमा,महागाई, बेरोजगारी, GST आरोग्य,अशा महत्वाच्या समस्या कडे शासनाचे दुर्लक्ष. संतोषसिंह रावतधरणे आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादपिंभूर्णा – मागील वर्षातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांची फार मोठी नुकसार झाली होती.व १४ हजार शेतक-यांनी पी.एम. पिक विमा योजनेचा विमा काढलेला होता.नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले.तरीदेखील शासनाने व विमा कंपनीने विम्याचे पैसे दिले नाही. करीता शेतकऱ्यांच्या हितासाठी कांग्रेस नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात वकिलाच्या मार्फत कोर्टात केस दाखल केली. त्यामुळे शासन व विमा कंपनीला जाग आली. यासाठी ९ आक्तटोबर २०२४ रोजी पोंभुरणा येथे शासनाचा निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, बेरोजगारी,आरोग्य,वाढती महागाई स्टॅम्प पेपर भाववाढ अशा अनेक समस्या सुटल्या नाही.करीता आपल्या हक्कासाठी संघर्ष करुन न्याय मागवा लागत आहे.असे विचार कांग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही १० वर्षात भाजपच्या काळात फक्त,रस्ते,नाल्या,इमारती, बांधून पैसे लुटण्याचे काम केले आहे. अशा नेत्यांना निवडून देऊ नये अशी टीका माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी केली. याप्रसंगी मुल कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी इंदिराजी,राजीवजी यांचे कार्य व योजना आणि वाढलेली महागाई यावर आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या याबाबत सविस्तर प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे महासचिव ओमेश्वर् पद्मगीरवार, यांनी केले. संचालन धम्मा नीमगडे यांनी केलेमंचावर तालुका कांग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल, शहर अध्यक्ष अशोक गेडाम, महिला अध्यक्षा वैशाली बुरांडे, प्रिया पातळे,नगर सेवक नरेंद्र बुरांडे, मुल शहर अध्यक्ष पवन नीलमवार,दादा पाटील ठाकरे, श्री.गेडाम, दीऊ रणदिवे यांचेसह पोभूर्णा तालुका,शहर व ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या सांखेने उपस्थित होते. यानंतर शेतकरी व नागरिकांच्या समस्याच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पोभूर्णा यांचे मार्फत नाम.मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments