चंद्रपूर वार्ता
चंद्रपूर स्थानिक पाठनपुरा येथील एका बारमध्ये बसलेल्या दोन पोलिसांसोबत झालेल्या भांडणात गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने आपल्या मित्रांच्या मदतीने दोन पोलिसांवर चाकू हल्ला केला. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. ही घटना काल (शुक्रवार) रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरात घडली. दिलीप चव्हाण असे मृतक तर समीर चाफले गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे.