*ओबीसी कल्याण आणि विदर्भ विकास हेच माझे अंतिम ध्येय : डॉ. अशोक जीवतोडे*
*वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प; विदर्भभरातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती*
चंद्रपूर :
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर संघर्ष करत राहणे हेच माझे अंतिम ध्येय असल्याचा निर्धार विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात मिळालेल्या प्रेम, सन्मान आणि शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला.
डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. ११ जून) चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विदर्भातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभेच्छांसह आवर्जून उपस्थित राहिलेले माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर, अनिल सोले, संजय धोटे, जिल्हा बँकेचे पदाधिकारी व अध्यक्ष रवींद्र शिंदे, संजय डोंगरे, आवेश पठाण, नगराध्यक्ष संगीता खांडेकर, प्रभुजी देशपांडे, वसंतराव थोटे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. अशोक जीवतोडे यांच्या कार्याचा गौरव करीत शुभेच्छा दिल्या.
याशिवाय गौरीशंकर पाराशर, मोहन दीक्षित, राहुल पूगलिया, दीपक पारेख, राजेंद्र वैद्य, तुकाराम कोंगरे, प्रवीण पडवेकर, हरीश शर्मा, माजी प्राचार्य सुधाकर उमाटे, माजी प्राचार्य किशोर वाट, श्रीधर मालेकर, डॉ. नंदकिशोर खत्री, बंडू धोत्रे, अॅड. पी. एम. सातपुते, सचिन राजुरकर, नरेंद्र बोबडे, भास्कर ताजने, बिरजू पाझारे, प्रफुल चटकी, राजू बिल्लोरिया, जयसिंग गोहोकर, सुनील दहेगावकर, अनिल धानोरकर, विनोद दत्तात्रय, राहुल पावडे, रवि गुरुनुले, रवि लोणकर, महादेव शिवणकर, सिनेट सदस्य संजय गोरे, डॉ. संभाजी वाडकर, प्राचार्य जनार्दन काकडे, प्राचार्य आसुटकर आदींसह विदर्भातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. जीवतोडे यांच्या कार्याचा गौरव केला.
अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी डॉ. जीवतोडे यांच्या शिक्षण, समाजकारण, ओबीसी हक्कांची चळवळ आणि विदर्भाच्या प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण भूमिकेचे विशेष कौतुक केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे अनेकांनी नमूद केले.
कार्यक्रमस्थळी विविध संस्था, संघटना आणि समर्थकांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सोबतच ठिकठिकाणी फळवाटप, वृक्षारोपण, वृद्धाश्रमाला अन्नदान, पुस्तक वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली असून, समाजातील विविध घटकांनी डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वावरील नितळ विश्वास आणि नितळ प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केले.




