Monday, August 17, 2026
Google search engine
spot_img

_कर्तव्यावर जाताना काळाचा घाला! कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा भीषण अपघात दुर्दैवी मृत्यू__

चंद्रपूर : कर्तव्य बजावण्यासाठी घरातून निघालेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आज सकाळी झालेल्या भीषण अपघात दुर्दैवी अंत झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्लीजवळील वलनी परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, *विशाखा जुमडे उर्फ बन्सोड* वय अंदाजे ३० वर्षे, रा. कळमगाव (गन्ना) ता. सिंदेवाही या आज सकाळी कारने कळमगाववरून चंद्रपूरकडे कर्तव्यावर जात होत्या. चिचपल्ली जवळील वलनी परिसरात त्यांच्या कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकसोबत समोरासमोर भीषण धडक झाली.

धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात विशाखा जुमडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला.

*पोलीस दलात शोककळा*
विशाखा जुमडे या कर्तव्यनिष्ठ आणि मृदुभाषी अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि समाजसेवा या दोन्ही जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळत होत्या. कर्तव्यावर जातानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस दलासह संपूर्ण सिंदेवाही आणि चंद्रपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. चिचपल्ली पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांमधून मत व्यक्त होत आहे.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments