घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगाराकडुन १२ घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर नी उघडकीस आणुन १९,१०,०००/- रू. चे सोन्याचे, यांदीचे दागीने केले जप्त
दिनांक २१/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक मा. पोलीस अधिक्षवा साहेब, चंद्रपुर यांचे आवेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोझीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेब इतर अवैध पंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होतुन चंद्रपुर शहर परिसरात पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे सुरेश महादेव कामरे, वय-६० वर्ष, चंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ हा चोरी केलेले सोन्याचे दागीने विकणे करीता कुठे तरी घेवुन आत आहे अशा अबरे वरून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे २,६१,०००/- रूयाचे सोन्याचे दागीने मिळून आले.
नमुद आरोपीस सोन्याचे दागीन्याबात विचारणा केली असता, त्यांनी पोलीस स्टेशन, तळोधी परिसरातील मौजा आकापुर येथे रात्री दरम्यान घरफोडी करून चोरी केल्याचे सांगितले. वमुद आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केले असता आरोपी नामे नामे सुरेश महादेव कामरे, वय-६० वर्ष, चंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ यांनी आज पावेतो पोलीस स्टेशन भद्रावती-०१, वरोरा-०३, सावली-०१, मुल-०१, तचोळी-०५ तसेव नागभिड ०१ अश्या घरफोड्या केल्याची कबुली दिली. वरील सर्व घरफोड्या मधील चोरी केलेला मुद्देमाल एकुण १९,१०,००० रूपयाचे सोन्याचे व चांदीचे दागीने व नगदी रुपये पंचा समक्ष आरोपीकडून जप्त करण्यात आले.
आरोपी नामे ब्रामे सुरेश महादेव कामरे, वय-६० वर्ष, चंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ हा मागील २० वर्षापासुन चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्हयात फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे करीत आहेत.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुग्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, सफी/धनराज करकाडे, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहया/रजनिकांत पुठ्ठयार, पोहया/दिपक डोंगरे, पोहवा / चेतन गज्जलवार, पोहवा/सुरेंद्र महंतों, पोअ/प्रफुल जारघाटे, पोअ/प्रशांत नागोसे, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/शशांक बदामवार, पोअ/अमोल सावे, चापोहया/दिनेश अराडे, चापो.अ/मिलीद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.